संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

अमरनाथमध्ये भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा पूर्ववत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ढगफुटी झाली. यामध्ये अनेक यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून ही अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र अमरनाथ गुहेच्या परिसरातील हवामानामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने भाविकांसाठी हेलिकॉप्टर सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे. परंतु पायी यात्रेला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.

ज्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या प्रवासातून अमरनाथच्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर सुविधा आजपासून पूर्ववत करण्यात आली. अमरनाथला जाण्यासाठी पहलगाम आणि बालाटाल हे दोन बेस कॅम्प आहेत. बालाटालचा मार्ग खडतर असून तो परिसर प्रवासासाठी बंद आहे. मात्र बालाटालच्या खाली आर्मीच्या बेस कॅम्पमधून भाविकांसाठी हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी भाविक कुठूनही हेलिकॉप्टरची बुकिंग करू शकतात. 

दरम्यान, ढगफुटीनंतर अमरनाथची पायी यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र हेलिकॉप्टर सुविधा सुरू झाल्यामुळे लवकरच पायी यात्रासुद्धा सुरू होईल, अशी आशा बालाटाल परिसरात सध्या या यात्रेची प्रतीक्षा करणाऱ्या हजोरो भाविकांना आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami