संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या
बहिणीचा संशयास्पद मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- ‘देवयानी’ या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तीन आठवड्यापूर्वी भाग्यश्रीच्या भावजींचा (बहिणीचे पती) मृत्यू झाला. त्यानंतर लगेच तिच्या बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी भाग्यश्रीने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली. मधु मार्कंडेय असे तिच्या बहिणीचे नाव असून तिचा मृत्यू घातपाताने झाल्याचा अंदाज वर्तवला जातो.
रविवारी अचानक चक्कर आल्याने मधु खाली पडली. तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तिची हत्या झाल्याचा कुटुंबीयांनी दावा केला. तसेच मधुच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी माहिती दिली की, ‘मधू मार्कंडेय केक बनवतात. रविवारी मधु आणि तिचा मित्र काही कामानिमित्त बाहेर गेले होते. पण अचानक चक्कर आल्याने मधू खाली पडली. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथून तिला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. त्यातच तिचा मृत्यू झाला. आम्ही अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या