नाशिक:- सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शनिवारी भाजपात प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यतक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भाजपात प्रवेश केला.
२०२० मध्ये प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. कोरोनाच्या काळात त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक मंडळींना मदत केली होती. मात्र २ वर्षांतच प्रिया यांनी राष्ट्रवादीला रामराम केला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण मात्र अजून समोर आले नाही. प्रिया बेर्डे यांनी 7 जुलै 2020साली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांच्याबरोबर 2020मध्ये अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे, अभिनेता विनोद खेडेकर, निर्माता संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक सुधीर निकम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.