कॅलिफोर्निया : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदाच जगाला दिसला! जोनास ब्रदर्शच्या एका कार्यक्रमात प्रियांका लेकीला – मालती मेरी – हिला घेऊन आली होती. यावेळचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रियांकाची गोड मुलगी पहिल्यांदाच जगासमोर आली. यापूर्वी प्रियांका आणि निक यांच्यासोबतचे मालतीचे फोटो प्रियांका पोस्ट करत असे, पण त्यातला मालतीचा चेहरा लपवत असे.
कॅलिफोर्नियामध्ये 30 जानेवारीला जोनास ब्रदर्सच्या सन्मानार्थ हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार समारंभात अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या मुलीसोबत उपस्थित होती. बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. प्रियांकाचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या आयुष्यातले खास क्षण सोशल मीडियावर टाकत असते. सोशल मीडियावर या माय-लेकीच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव झाला.