संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अभिनेत्री जिया खानच्या आईची याचिका मुंबई हाय कोर्टाने फेटाळली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी तिची आई राबिया खानने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. जियाची आत्महत्या नाही तर हत्या आहे, असा आरोप राबियाने केला होता. परंतु न्यायालयाने तिची याचिका फेटाळली. या प्रकरणात सीबीआयचा तपास योग्य आहे, असा निर्वाळा हाय कोर्टाने दिला.
अभिनेत्री जिया खानने मुंबईतील घरात आत्महत्या केली होती. ३ जून २०१३ रोजी तिचा मृतदेह घरात सापडला होता. बॉयफ्रेंड सूरज पंचोलीने तिला आत्महत्येला प्रवृत्त आरोप केला जात होता. जियाची आई राबिनाने तिची आत्महत्या नाही तर हत्या आहे, असा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. परंतु राबिनाची ही याचिका म्हणजे सुनावणीला विलंब करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगून न्यायालयाने याचिका फेटाळली. या प्रकरणाचा सीबीआयने केलेला तपास योग्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami