संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

अभिनेता स्टीफन बॉस यांची
गोळी झाडून आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लॉस एंजेलिस – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता स्टीफन बॉस यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. लॉस एंजेलिसमधील हॉटेलच्या खोलीत पोलिसांना बॉसचा मृतदेह सापडला. स्टीफन बॉस ‘द इलेन डी जोन्सआणि ‘सो यू थिंक यू कॅन डान्स सारख्या शोसाठी ओळखले जात होते.
याप्रकरणी स्टीफन बॉसची पत्नी एलिसन हॉकरने माहिती दिली. ती म्हणाली की, बॉस त्यांची कार न घेता घरातून निघून गेले होते, हे खरे तर खूप विचित्र होते, कारण बॉस कधीही त्यांच्या कारशिवाय कुठेही जायचे नाहीत. मला जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की, माझे पती स्टीफन आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत. ते आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व देत असे. प्रेम त्यांच्यासाठी सर्वस्व होते. ते आमच्या कुटुंबाचा कणा होते. ते एक चांगले पती आणि वडील होते. त्यांच्या चाहत्यांसाठीही ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची पोकळी आयुष्यात नेहमीच जाणवे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami