संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अब्दुल सत्तारांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

परभणी : शिंदे गटातील आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे परभणी दौऱ्यावर आहेत. यानिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्णा येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी सत्तार यांचा ताफा अडवला. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनी ‘अब्दुल सत्तार हाय हाय’ अशा घोषणा दिल्या.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवाताचा पोलिसांनी तात्काळ शिवसैनिकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. त्यानंतर सत्तार यांनी गाडीतून खाली उतरुन शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मागण्यांचे निवेदनही स्वीकारले. कृषीमंत्र्यांनी आमच्या संपूर्ण जिल्ह्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.याशिवाय अनुदान यादीत परभणीचाही समावेश करावा,आदी प्रमुख मागण्या यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आल्या. या आंदोलनामुळे काही काळ वातावरण बिघडले होते. मात्र निवेदन स्वीकारल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा ताफा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami