संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

अफगाणिस्तानच्या काबूलतील स्कूलमध्ये स्फोट ! 19 जणांचा ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

काबूल – अफगाणिस्तानच्या काबूल शहरातील काबूल एज्युकेशन स्कूलमध्ये झालेल्या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. या मृतांमध्ये बहुतांश शालेय विद्यार्थी असून इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने हा स्फोट घडवण्याचा दावा केला जात आहे,
काज उच्च शिक्षण केंद्र पोलीस स्टेशन 13 पासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या काबूल एज्युकेशन स्कूलमध्ये आज सकाळी अनेक विद्यार्थी परिक्षा देत होते. त्यावेळी एक मोठा शक्तीशाली बॉम्बस्फोट झाल्यानेे परिसराला मोठा हादरा बसला. स्फोटानंतर काही जणांच्या मृतदेहाचे अवयव इतरत्र पडले होते. अशा विदारक परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. मात्र काही रुग्णालायत नण्याआधीच मृत्यू झाला तर काहीचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. या स्फोटात एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांताने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. ज्यामध्ये बहुतांश हजारा आणि शिया समुदायाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आले होते. याआधी एप्रिलमध्ये काबूलमधील दोन शैक्षणिक संस्थांमध्ये स्फोट झाले होते, त्यात सहा जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते. या दोन्ही शाळा काबूलच्या दश्ते बर्ची भागातही होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami