संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अपघात की घातपात? काश्मीरच्या पेट्रोल पंपाजवळ बसमध्ये स्फोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या प्रवासी बसमध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शक्तिशाली स्फोट झाला. त्यात बसचा अर्धा भाग उध्वस्त झाला. स्फोटामुळे शेजारच्या बसचेही नुकसान झाले. या घटनेत २ जण जखमी झाले आहेत. ८ तासांत बसमध्ये घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे. पेट्रोल पंपाजवळ घटना घडल्यामुळे हा अपघात होता की घातपात? अशी शंका निर्माण झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
दिवसभर प्रवासी वाहतूक केल्यानंतर बस उदमपूर येथील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ नेहमीप्रमाणे उभी होती. त्यावेळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बसमध्ये स्फोट झाला. त्यात बस शेजारी उभ्या असलेले २ जण जखमी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बसच्या शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचेही स्फोटामुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने पेट्रोल पंपाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बसच्या मध्यभागी झालेला स्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्फोटामुळे बसचा एक भाग उध्वस्त झाला. अतिरेक्यांच्या हा घातपाताचा कट होता का? अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे ते कसून तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami