सातारा : आज शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगडावर कार्यक्रम आयोजित कारण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पण यावेळी खासदार उदयनराजे भोसले गैरहजर होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा तर झाली.त्यानंतर मी प्रतापगडावर गेलो नाही म्हणजे नाराज आहे असे नाहीतर मला कोणी बोलावले नाही मात्र उशिरा पत्रिका हातात आल्यावरच मला समजले की आज प्रतापगडावर सोहळा आहे,असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले, प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचे नाकारण्यात आले होते. याच संदर्भात उदयनराजे भोसले प्रतिक्रिया देताना भावुक झाले होते. शिवरायांचा अवमान पाहण्यापेक्षा मेलो असतो तर चालले असते असे म्हणत उदयनराजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर खंत व्यक्त केली होती.त्यावर आज पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी मी रडलो नव्हतो,फक्त भावना अनावर झाल्या होत्या रडणाऱ्यांपैकी मी नाही असे सांगितले.