संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अनुदान घेतल्याशिवाय माघार नाही! आझाद मैदानात शिक्षकांचे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- अनुदानाच्या मागणीसाठी २०-२२ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या शिक्षकांनी आता निकराची लढाई सुरू केली आहे. आझाद मैदानात त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. १०० टक्के अनुदान मिळाल्याशिवाय आता आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. “करो या मरो’ची लढाई शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या धरणे आंदोलनातून सुरू केली आहे.
राज्यातील अंशतः अनुदानित २० आणि ४० टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा. त्रुटींची पूर्तता केलेल्या अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सरसकट हा शब्द काढून पूर्वीच्या नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यासाठी राज्य विनाअनुदानित आणि अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. विनाअनुदानित शाळांमधील ८० ते ९० हजार शिक्षक अनेक वर्षांपासून या मागणीसाठी सतत आंदोलने करत आहेत. परंतु सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. नेहमीच चालढकल करत आहे. शिक्षकांना सेवा संरक्षण आणि अनुदान देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षकांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला जात नाही. तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार आम्ही केला आहे. आमचे हे आंदोलन म्हणजे “करो या मरो’ची लढाई आहे, असे कृती समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांची परवड सुरूच आहे. अनुदान जाहीर करूनही त्यांना ते वेळेत मिळत नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांनी या वेठबिगारीला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. हजारो शिक्षक बिनपगारी सेवानिवृत्त झाले. म्हणून सरकारने २० टक्के सरसकट अनुदान देण्याचा सप्टेंबर २०१६ चा निर्णय रद्द करून जुन्या निर्णयानुसार अनुदान द्यावे. या मागणीसाठी आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami