संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

अनिल परब यांची ईडीकडून चौकशी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- दापोली येथील रिसॉर्टचच्या जमीन खरेदी व बांधकाम प्रकरणी तपास करणार्‍या सक्तवसुली संचालनालयाने परिवहनमंत्री अनिल परब यांना काल समन्स बजावले होते. त्यानुसार अनिल परब आज दुपारी 12 वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे 2017 साली एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. परंतु 2019 मध्ये त्याची नोंदणी झाली होती. त्यानंतर ही जमीन 2020 मध्ये मुंबईतील एका केबल ऑपरेटरला एक कोटी 10 लाख रुपयांना विकली आणि 2017 ते 2020 दरम्यान या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले आणि त्यावर सहा कोटींहून अधिक खर्च झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, अनिल परब यांना याआधीही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र परब हे शिर्डीला असल्याने चौकशीला जाऊ शकले नव्हते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami