मुंबई – 100 कोटी वसुलीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज दिलासा देत न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी नागपूरला जाण्यास परवानगी दिली. मात्र, दर सोमवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.
न्यालयालयाने त्यांना जामीन मंजूर करतानाच अनेक अटी देखील घातल्या आहेत. जर मुंबईच्या बाहेर जायचे असेल तर न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे,अशी अट त्यांना घातली होती. अशात त्यांनी नागपुरला जाण्यास परवानगी मिळण्यासाठी तीन दिवसांपूर्वी एक अर्ज दाखल केला होता. ‘नागपुरातील काटोल हा मतदारसंघ आहे, त्यामुळे मतदारसंघातील लोकांच्या संपर्कात राहाता यावे, आमदार म्हणून कर्तव्य बजावता यावे तसेच कुटुंबाला भेटता यावे यासाठी नागपूर जिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळावी` असे आपल्या अर्जात देशमुख यांनी म्हटले होते. आज न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करत 4 आठवड्यांसाठी नागपूरला जाण्यास त्यांना परवानगी दिली.