संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अनिल अंबानींची एक कंपनी विकली तर दुसरी कंपनी बिर्ला विकत घेणार?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कर्जबाजारी झालेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड ऑटम इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरने विकत घेतली आहे. त्यांची दुसरी रिलायन्स निप्पण लाइफ इन्शुरन्स ही कंपनी खरेदीदारांच्या स्पर्धेत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला सामील झाले आहेत. त्यामुळे ते ही कंपनी खरेदी करू शकतात. या कंपनीतील ५१ टक्के हिस्सेदारी खरेदीची तयारी बिर्ला उद्योग समूहाने दाखवली आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहातील सर्वच कंपन्या तोट्यात आहेत. त्यामुळे कंपन्यांनी घेतलेली कर्जे मोठ्या प्रमाणात थकली आहेत. या कंपन्या डिवाळखोरीत निघाल्यामुळे त्यांची विक्री केली जात आहे. त्यात त्यांची रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड विकली आहे. त्याची माहिती शुक्रवारी त्यांनी मुंबई शेअर बाजाराला दिली. त्यानंतर त्यांच्या उद्योग समूहातील रिलायन्स निप्पण लाइफ इन्शुरन्स विकण्यात येणार आहे. तिच्या खरेदीसाठी १४ उद्योग समूह स्पर्धेत उतरले आहेत. विशेष म्हणजे त्यात कुमार मंगलम बिर्ला यांचा उद्योग समूहही उतरला आहे. त्यांनी या कंपनीची ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. ही कंपनी खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे. आतापर्यंत या लिलावात १४ कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यात बिर्ला समूह आघाडीवर आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami