श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेकी यांच्या चकमक झाली. त्यात लष्करी-ए-तोयबाचा हायब्रीड अतिरेकी सज्जाद तांत्रे ठार झाला. त्यानंतर या भागात सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली.
अनंतनागमध्ये अतिरेकी आले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शोध मोहीम हाती घेतली होती. तेव्हा बिजबेहरा भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी सज्जाद तांत्रे ठार झाला. 13 नोव्हेंबरला परप्रांतीय मजुराच्या झालेल्या हत्त्येत तो सहभागी होता, अशी माहिती जम्मू- काश्मीरच्या पोलिसांनी दिली.