संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अदानी बंदर प्रकल्पाचा विरोध वाढला! कोचीतील चर्चचे धर्मगुरु आंदोलनात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तिरुअंनतपुरम- केरळच्या विझिंजममधील अदानी बंदर प्रकल्पाला होणारा विरोध आणखी तीव्र झाला असून मच्छिमारांना साथ देण्यासाठी कोचीतील अनेक चर्चच्या धर्मगुरूंनी आंदोलनाच्या मैदानात उतरले आहे, त्यांनी आज सकाळी मानवी साखळी उभारुन निदर्शने केली.
बांधकामादरम्यान किनारपट्टीच्या जमिनीचे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलक करत आहे. मच्छिमारांचे पुनर्वसन आणि समुद्राच्या धूपावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे, ही मागणी घेऊन आत कोचीतील सर्व चर्चच्या धर्मगुरु एकत्र आले आणि मानवी साखळी उभारून अदानी बंदर प्रकल्पाचा विरोध तीव्र केला. गेल्या महिन्यातही शेकडो मच्छीमारांनी राज्याच्या राजधानीत मोठा मोर्चा काढला आणि डाव्या सरकारवर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. 1 सप्टेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अदानी बंदरांच्या चालू असलेल्या विझिंजम बंदर प्रकल्पाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. आंदोलकांनी बंदर परिसरात घुसू नये, आणि बाहेर शांततेने आंदोलन करावे, असे आदेश पण न्यायालयाने दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami