संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या! हिंगोलीत शेतकऱ्यांचा बेमुदत संप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिंगोली- अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी आणि पिक विमा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावा या व इतर मागण्यांसाठी हिंगोलीतील शेतकरी बेमुदत संपावर गेले आहेत. रस्त्यावर भाजीपाला फेकून गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर त्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. असे असताना सेनगाव तालुक्यातील गोरेगावसह तीन महसूल मंडळे अतिवृष्टीतून वगळली आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी याच्या विरोधात निवेदन देऊन अनुदानाची मागणी केली आहे. अतिवृष्टीतील नुकसानीची भरपाई मिळावी, पीक विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी रस्त्यावर टोमॅटो व भाजीपाला फेकून अतिवृष्टीतून वगळल्याबद्दल सरकारचा निषेध केला. त्याच्या विरोधात गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे. पीककर्ज हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, वीज बिलांची वसुली थांबवावी आदी मागण्यांसाठी त्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami