संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अतिक्रमण हटवणाऱ्या पोलिसांवर हल्ला! पाटण्यात एसपीसह अनेक पोलिस जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटणा : पाटणा जिल्ह्यातील राजीव नगर भागातील नेपाळी नगर परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. असून, स्थानिक लोकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहराचे एसपी अमरीश राहुल यांच्यासह अनेक पोलीस गंभीर जखमी झाले असल्यचेही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी १७ जेसीबी लावण्यात आले आहेत. तसेच,२००० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र येथील स्थानिकांच्या प्रचंड विरोधानंतर पोलिसांची कारवाई सुरू होती. पाटण्याचे जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. राजीव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेपाळी नगरमधील ७० घरांवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांनी सांगितले की, अतिक्रमण करतेवेळी स्थानिकांनी घराच्या छतावरुन दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीत एसपी सिटी अंबरिश राहुल यांच्यासह अनेक पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.

पाटणा जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, बेकायदा बांधकामे हटवण्यासाठी तीन वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. आम्ही आमच्या ताब्यातील ४० एकर जमीन घेणार असून त्यात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करू. दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी दहाहून अधिक लोकांना अटक केली आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान,अतिक्रमणाला विरोध करणारे आणि पोलिसांमध्ये झालेल्या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेषतः नेपाळी नगरमध्ये अनेक घरे बेकायदेशीरपणे बांधली गेली आहेत. ७० बेकायदा पक्की घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र असे असतानाही ते सोडण्यात आले नाही.सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami