संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी नेत्याची तानाजी सावंताना धमकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उस्मानाबाद – उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरोग्यमंत्री ताजानी सावंत यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे.आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करत भर चौकात उघडा करुन मारण्याची धमकी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी दिली आहे.अजित पवार व्यासपीठावर असताना सुरेश पाटील यांनी ही टीका केली आहे.

एक माजलेला मंत्री मराठा समाजाबद्दल बेभान बोलतो, आरक्षण आताच आठवले का? मराठ्यांना माज आला का? असे म्हणतो. तानाजी सावंतांनी मराठ्यांबद्दल नीट बोलावं नाहीतर चौकात उघडा करुन मारू. यांचा माजुरीपणा उतरलाच पाहिजे,अशी टीका कारखानदार सुरेश पाटील यांनी केली आहे.एवढेच नाही तर जिल्ह्यात राष्ट्रवादी संपत चालली असून तानाजी सावंत व राणा पाटील यांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व पार्थ पवार यांनी करावे म्हणजे यश येईल असे साकडेही सुरेश पाटील यांनी अजित पवार यांना जाहीर सभेत घातले आहे.सुरेश पाटील यांच्या टीकेनंतर अजित पवारांनीही तानाजी सावंत यांना लक्ष्य केले. काही लोकांनी तर मराठा समाजाची खाज काढली, त्यांच्या घरचा आहे का? अशी टीका अजित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली. राणा पाटलाला अवदसा सुचली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडली.त्यांना काय कमी केले होते अशा शब्दांत अजित पवार यांनी विचारणआ केली. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणे पवार कुटुंबाच्या चांगले च जिव्हारी लागले होते. त्याचे शल्य आजही पवार कुटुंबाच्या मनात असल्याचे पुन्हा एकदा उघड झालं आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami