संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर! राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सुमारे पाऊण तास त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी डोवाल यांनी आज सकाळीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राजभवनावर जाऊन त्यांनी कोश्यारी यांची भेट घेतली, विविध मुद्द्यांवर जवळपास अर्धा तास चर्चा केल्याचीही माहिती आहे.

अजित डोवाल मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. आज सकाळीच त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेटही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यपाल कार्यालयाने ट्विट करुन या भेटीची माहिती दिली आहे. अजित डोवाल पोलीस महासंचालक रजनीश शेठ तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील भेट घटली. त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत घातपात घडविण्याच्या सातत्याने धमक्या आलेल्या आहेत. तसेच दोन आठवड्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे शस्त्रास्त्रांनी भरलेली बोटही आढळून आली होती. याच अनुषंगाने डोवाल हे पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून सुरक्षाविषयक आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami