संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

‘अग्निवीर’साठी आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गेल्या वर्षी तिन्ही सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना सुरू केली होती. यानंतर सरकारने नियमांमध्येही बदल केले आहेत. अग्निवीर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले आहेत. त्यानुसार आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

नव्या बदलानुसार आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले ​​असून, आयटीआय, पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेतील विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत.सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. या मोठ्या बदलामुळे आता या भरतीमध्ये आणखी उमेदवार सहभागी होतील, असा विश्वास लष्कराला आहे.

विशेषतः ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२३ आहे. तसेच, यासाठी निवड प्रक्रिया १७ एप्रिल २०२३ रोजी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या