संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

‘अग्निपथ’विरोधात खोट्या बातम्या; ३५ व्हाॅट्सऍप ग्रुपवर बंदी

whatsapp, communication, social networks-1984584.jpg
Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेबाबत खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्र सरकारने काल, रविवारी ३५ व्हाॅट्सऍप ग्रुपवर बंदी घातली. गृहमंत्रालयाने याबाबत माहिती दिली. तसेच अफवा पसरवण्याच्या आणि निदर्शने केल्याच्या आरोपाखाली किमान दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने व्हाॅट्सऍप तथ्य तपासणीसाठी ८७९९७११२५९ हा क्रमांक जारी केला आहे. यावर अशा कोणत्याही ग्रुपची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी भारतीय तरुणांसाठी संरक्षण दलात नोकरी भरतीच्या अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. घोषणा होताच देशातील वेगवेगळ्या भागात या योजनेविरोधात हिंसक निदर्शने सुरू झाली. दरम्यान, केंद्राने स्पष्ट केले आहे की, अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही. तसेच तोडफोड आणि जाळपोळीच्या मुद्द्यावर संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हिंसक निदर्शने करणाऱ्यांची भरती केली जाणार नाही. इच्छुकांना आंदोलनात भाग घेतला नाही असे लेखी पत्र सादर करावे लागेल. या पत्राची पोलिसांकडून पडताळणी केली जाईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami