संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

अखेर मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद- मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडा भत्ता कपात सप्टेंबर महिन्याच्या पगारातून करण्यात आला आहे. बंब यांच्या मागणीनंतर औरंगाबादच्याखुलताबाद तालुक्यात ही पहिली कारवाई झाली आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत मुद्दा मांडला आणि गावात न राहता घरभाडे भत्ता घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी सुद्धा केली.या काळात अनेक शिक्षक संघटनांनी आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली. मात्र प्रशांत बंब आपल्या मागणीवर ठाम होते. आता प्रत्यक्षात प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीनंतर औरंगाबादच्या खुलताबाद पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने याबाबत एक पत्र काढलं होतं. मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचे पुरावे सादर करण्यात यावे, तसेच मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा पगारातून घरभाडे भत्ता कपात करण्याचा उल्लेख या आदेशात होता.यावेळी अनेक शिक्षकांनी मुख्यालयी राहत असल्याचे पुरावे सादर केले नाहीत. दरम्यान खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांचा मंगळवारी पगार झाला. यात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मागणीनंतर राज्यातील ही पहिली कारवाई समजली जात आहे.शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावं यासाठी सरकार जवळपास 200 कोटी रुपये शिक्षकांच्या घरभाडे भत्त्यावर खर्च करते. मात्र बहुतांश जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता घर भाडे भत्ता उचलतात असे आरोप होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami