संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अखेर घाटकोपरमधील राष्ट्रवादीची छटपूजा होणार! हायकोर्टाची परवानगी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई पालिकेचा निर्णय रद्दबातल

मुंबई – घाटकोपर (पूर्व) पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदानावर ३० व ३१ ऑक्टोबर रोजी छटपूजा करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर मुंबई महापालिकेच्या ‘एन वार्ड’ कार्यालयाने राष्ट्रवादीचा अगोदरचा अर्ज काही तांत्रिक कारणास्तव फेटाळून भाजपप्रणित पदाधिकाऱ्यांच्या अटल सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानला परवानगी दिली होती.त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित मंडळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व गटनेत्या राखी जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.जे. जमादार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.माजी नगरसेविका राखी जाधव यांनी त्यांच्या दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळाला घाटकोपर (पूर्व) येथील आचार्य अत्रे मैदानात छठपूजेसाठी परवानगी मिळविण्यासाठी २५ जुलै २०२२ रोजी मुंबई महापालिकेच्या एन वार्ड कार्यालयात, पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे लेखी अर्ज केला होता. मात्र नंतर पालिका ‘एन’ वार्ड कार्यालयाने राखी जाधव यांच्या दुर्गा परमेश्वरी मंडळाच्या अगोदर आलेल्या अर्जाला अटी-शर्तींवर परवानगी दिलेली असताना त्यांनी त्याचा भंग केला व पूर्तता केली नाही.त्यांनी मैदानाचे भाडे भरले नव्हते आणि स्थानिक पोलिसांची परवानगीही आणली नव्हती, अशी सबळ कारणे देत परवानगी नाकारली. तर दुसरीकडे,भाजप प्रणित पदाधिकाऱ्यांच्या अटल सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानने राखी जाधव यांच्या मंडळाच्या अर्जानंतर अर्ज सादर केला असला तरी त्यांनी मैदानाचे ७४ हजार भाडे भरले.अटी- शर्तीनुसार ट्रॅफिक, स्थानिक पोलीस, महापालिका व अग्निशमन दलाची परवानगी मिळवली असल्याने उपायुक्त परिमंडळ -६ यांनी या मंडळाला छटपूजा करण्यासाठी मैदानाची एक तृतीयांश जागा मंजूर केली होती, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला होता.
मात्र पालिकेकडे वारंवार पाठवपुरावा करूनही आणि अर्जातील त्रुटी लक्षात आणून न देता परस्पर राष्ट्रवादीप्रणित मंडळाचा अर्ज एन वार्ड कार्यालयाने परस्पर फेटाळून लावल्याने राखी जाधव यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून छटपूजा करण्यासाठी त्यांच्या मंडळाने अगोदरच सादर केलेल्या अर्जाला परवानगी देण्याची मागणी लावून धरली होती.
न्यायालयाने पहिल्या सुनावणीत भाजपप्रणित मंडळाच्या बाजूने निकाल देत राखी जाधव यांना धक्का दिला होता.मात्र राखी जाधव यांनी सुट्टीकाळातील न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.त्यानुसार झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राखी जाधव यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या मंडळाला अखेर आचार्य मैदानात छटपूजा करण्यास परवानगी दिली.तसेच भाजपच्या शिफारशीवर आधारित अटल सामाजिक संस्कृती सेवा प्रतिष्ठानला छट पूजेसाठी पालिकेने दिलेली परवानगीही न्यायालयाने रद्दबातल ठरवली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami