संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अखेर ‘ग्लोबल टीचर’ डिसलेगुरुजींचा राजीनामा नामंजूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर: सोलापुरातील ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा अखेर प्रशासनाकडूनच नामंजूर करण्यात आला. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी हा राजीनामा नामंजूर केला आहे. शिक्षणविभागाकडून त्रास दिला जात असल्यसामुळे डिसले यांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्यावर दोन वर्ष गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांसंदर्भात त्यांच्यावर चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालमध्ये देखील डिसले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र या अहवालातील निष्कर्ष चुकीचे असल्याची माहिती समोर आली. यानंतर मात्र रणजितसिंह डिसले यांनी आपल्या सहशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. ८ ऑगस्ट पर्यंत डिसले यांना राजीनामा मागे घेण्याची संधी होती. मात्र डिसले यांनी आतापर्यंत आपला राजीनामा मागे घेतलेला नाही. दरम्यान, डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. डिसले यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानंतर डिसले राजीनामा मागे घेणार की त्यांचा राजीनामा नामंजूर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आज अखेर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami