संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

अक्षय पात्र किचनचे मोदींनी केले उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा मतदारसंघ वाराणसीच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी वाराणसीत ’अक्षय पात्र किचन’चे उद्घाटन केले. या किचनमध्ये एक लाख मुलांसाठी माध्यान्ह भोजन तयार केले जाणार आहे. अक्षय पात्र किचनमध्ये अनेक आधुनिक मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. या किचनमध्ये बसवण्यात आलेलं रोटी मेकिंग मशीन अवघ्या एका तासांत 40 हजार रोट्या तयार करण्यात आले आहे.
15 हजार स्क्वेअर मीटरमध्ये बनवलेलं अक्षय पात्राचं किचन बनवण्यासाठी 24 कोटी रुपये खर्च आलाय. किचनमध्ये रोटी बनवण्याचे मशीन आहे. यामध्ये पीठ आपोआप मळूनही घेता येऊ शकते. दरम्यान, 8 जुलै रोजी अक्षय पात्र किचन 25 हजार मुलांना अन्न देण्यात आले. 6 महिन्यांनंतर 1 लाख मुलांसाठी अन्न तयार केले जाईल. अक्षय पात्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष भरत दास यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात सेवापुरीतील शाळांमध्ये जेवण पोहोचवले जाणार आहे. या गटात 143 शाळा असून त्यापैकी 124 परिषद आणि 19 अनुदानित आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami