संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अक्षय कुमार आणि नितीन गडकरी यांच्यामुळे हुंडा प्रथेला प्रोत्साहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियमांबाबत काही घोषणा केल्या. या संदर्भात नितीन गडकरी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या जाहिरातीद्वारे वाहनात 6 एअरबॅग असणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या व्हिडिओद्वारे हुंडा प्रथेला प्रोत्साहन दिले जात आहे.जाहिरातीत वडील आपल्या मुलीला विवाहानंतर निरोप देत असल्याचे द़ृश्य आहे. आपल्या मुलीला लग्नानंतर सोडताना रडताना दिसत आहेत.

ज्यामध्ये मुलगी तिच्या वडिलांनी भेट दिलेल्या कारमध्ये बसून रडत आहे. यावेळी अक्षय कुमार मुलीच्या वडिलांना सांगतो की या कारमध्ये 6 एअरबॅग नाहीत. अशा स्थितीत मुलगी रडणार नाही तर हसणार का? यानंतर वडील तिला 6 एअरबॅग असलेली कार भेट देतात आणि मुलगी हसायला लागते. या जाहिरातत ग्राफिकच्या मदतीने अपघाताच्या वेळी 6 एअरबॅग्जचे महत्त्वही स्पष्ट करण्यात आले आहे.जनजागृतीसाठी बनवलेली ही जाहिरात हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर अनेक जण या जाहिरातीवर जोरदार टीका करत आहेत आणि नितीन गडकरी यांच्यावर हुंडा प्रथेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत आहेत.

या व्हिडिओवरून शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी, ‘या जाहिरातीत समस्या असल्याचे म्हणज, असे क्रिएटिव्ह कोण पास करतं? असा प्रश्न विचारला आहे. एवढेच नाही, तर सरकार सुरक्षिततेला चालना देण्यासाठी पैसे खर्च करत आहे, की हुंडा प्रथेला चालना देत आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनीही या मुद्द्यावरून व्हिडिओवर टीका केली आहे. ‘सरकार यातून अधिकृतरीत्या हुंड्याचे समर्थन करत आहे, हे दुर्दैवी आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी आणखीही एक मुद्दा उपस्थित केला आहे. ‘सायरस मिस्त्री यांचा मृत्यू रोडचे डिझाइन सदोष असल्यामुळे झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami