अहमदनगर – अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकऱ्याने गळाफास लावून घेऊन आत्महत्या केल्याने आज सकाळी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर शेतकरी संतप्त झाले.
अकोळनेर येथील शेतकरी पोपट जाधव यांची शेती असून त्यांनी गहू आणि हरबरा पेरणी केली असल्यामुळे पेरणीनंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची मोठी गरज असते. मात्र गेल्या आठ दिवसापासून वीज खंडीत केल्याने पोपट जाधव रोज शेतीमध्ये जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला का नाही याची पाहणी करून पुन्हा येत होते. मात्र गव्हाचे पीक समोर असताना पाणी असूनही वीज खंडित केली गेल्यामुळे गव्हाच्या पिकाला पाणी देऊ शकत नसल्याचे खंत मनात ठेवून त्यांनी अखेर आज पहाटेच्या दरम्यान शेता जवळील एका झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. जोपर्यंत वीज मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला.