संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अकोला जिल्ह्यात तुफान पाऊस! गावात शिरले पाणी, उमर्‍यात ढगफुटी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अकोला – अकोला जिल्ह्यातील काही भागात आज तुफान पावसाने हजेरी लावली.जिल्ह्यातील तेल्हारा,अकाेट या तालुक्यासह अन्य काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली.अकोट तालुक्यातील सातपुड्याचा परिसर असलेल्या शेतशिवार व गावात पाणी साचले. अतिवृष्टीमुळे सातपुड्यातून उगम असलेल्या नाल्यांना पूर आला.उमरा ते अडगाव खुर्द दरम्यान असलेल्या नदीसारख्या पाेहरा नाल्याला पूर आला.परिणामी अकाेट ते हिवरखेड हा मार्ग बंद झाला.काही ठिकाणी दुचाकीसह अन्य साहित्य वाहुन गेले.पावसामुळे पिके पाण्याखाली गेले असून, जनजीवन विस्कळीत झालेआहे.तर उमरा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला.

यंदा खरीप हंगामात जूनमध्ये काही दिवस पावसाचा खंड हाेता.मात्र नंतर जुले,ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात तुफान झाला. अतिवृष्टीमुळे कापूस, साेयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली.पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन घटणार असून शेतकऱ्यांच्या डाेक्यावर कर्जाचा डाेंगरही वाढणार आहे.अशातच आता परतीच्या पावसाने ऑक्टाेबर महिन्यातही थैमान घालणे सुरू केले असून आज मंगळवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू झाली आहे.बाळापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व्याळा परिसरात अतिवृष्टी झाली.निंबा,कवठा परिसरात शेतकऱ्यांनी शेतात साेंगून ठेवलेल्या साेयाबीनचे प्रचंड नुकसान झाले.काही वेळ कान्हेरी-देगाव हा मार्ग बंद हाेता.हातरुण येथही पाऊस झाला असून, शेतात नदीचे पाणी घुसल्याने सोयाबीन पाण्याखाली गेले.उमरा परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.अकाेट तालुक्यातील बाेर्डी परिसरात तुफान फाऊस झाल्याने गावातील रस्ते जलमय झाले हाेते. गावातून प्रचंड पाणी वाहत हाेते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami