संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुकांची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार लगबग सुरू असताना आज सकाळी निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 14 ऑक्टोबर या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 3 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 6 नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीच्या मतदानांचा निकाल जाहीर होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटकेंचा दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आज निवडणूक आयोगाला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागला. आज शिंदे गटाने या मतदारसंघात पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपने आपल्या ताब्यात घेतल्याने या पोटनिवडणुकीत आता शिवसेनेविरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami