संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत मनसे भाजपाला पाठिंबा देणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार असणार आहेत. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांचे नाव चर्चेेत आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला उमेदवार रिंगणात उतरविणार नाही. मात्र भाजपा पक्षाच्या उमेदवाराला मनसे मैत्रिपूर्ण पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती येथील मनसेच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याने दिली.
मनसे पदाधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार शिवसेना ठाकरे गट वारंवार मनसे पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. संपलेला पक्ष, भोेंगेवाला, आमच्या हिंदुत्वावरही राजकीय कुरघोडी केली जाते. त्यामुळे अशा टीका करणार्‍या पक्षाला या पोटनिवडणुकीत पाठिंबा न देता भाजपाला स्थानिक पातळीवर मदत करणे योग्य ठरु शकते. तसेच मनसे पक्षाचा आदेश आल्यावर मनसैनिक आपली निवडणूक रणनिती ठरविणार आहे. पण सध्या तरी स्थानिक पातळीवर भाजपाला पाठिंबा दिला जाणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मराठी मतांमध्ये विभागणी करण्यास मनसे यशस्वी होईल का? यावर प्रश्न चिन्ह आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या