संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अंधेरीच्या हॉटेलमध्ये मॉडेलची गळफास घेऊन आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- अंधेरी पश्चिम येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या ३० वर्षांच्या मॉडेलने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. कोणालाही डिस्टर्ब करू नका. मी खुश नाही. फक्त शांतता हवी होती, असे तिने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. वर्सोवा ठाण्याच्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

अंधेरी पश्चिम येथील हॉटेलमध्ये मॉडेल मुक्कामाला होती. बुधवारी रात्री ८ च्या सुमारास तिने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या वेटरने रूमची बेल अनेकदा वाजवली. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्याने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. त्यानंतर मॅनेजरने फोन करताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मास्टर चावीने त्यांनी हॉटेलच्या रूमचा दरवाजा उघडला. तेव्हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत मॉडेलचा मृतदेह सापडला. खोलीत सुसाईडनोट सापडली. त्यात तिने माफ करा. याला कोणीही जबाबदार नाही. कोणालाही डिस्टर्ब करू नका. मी खुश नाही. फक्त शांतता हवी होती, असे म्हटले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मॉडेलची पूर्ण माहिती आणि तिच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami