मुंबई – अंदमान आणि निकोबार बेटांचे धोरणात्मक महत्त्व आपण सर्वजण जाणतो. भारत सरकारने नेहमीच अंदमान आणि निकोबार बेटावर विशेष लक्ष दिले आहे. कारण ही बेटे बंगालच्या उपसागरात दक्षिण पूर्व आशियाच्या अगदी जवळ आहेत. पुरवठा साखळी टिकवून ठेवण्यासाठी सागरी वाहतूक ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते आणि स्थानिक बेटावरील रहिवाशांची ती एक जीवनरेखा आहे. प्रवासी आणि इतर सरकारी आणि खाजगी मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर सर्व काही अवलंबून असते. अंदमान आणि निकोबार बेटांवरील जहाजवरचे नाविक स्थानिक आहेत. नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया (न्यूसी)च्या वेतन करारामुळे आणि त्यांच्या कल्याणकारी उपक्रमांमुळे अंदमान आणि निकोबार बेटांमधील आमच्या सर्व नाविकांना आणि त्यांच्या कुटुंबांना संरक्षण आणि फायदा झाला आहे. असे न्युसिचे सरचिटणीस व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
२८ ऑक्टोबर २०२२ रोजी नॅशनल युनियन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (न्यूसी) एकदा मेनलँड आयलंड फ्लीट आणि फॉरशोअर फ्लीटमध्ये आणखी पाच वर्षासाठी “बहुमताची मान्यताप्राप्त युनियन” म्हणून घोषित केली आहे. अनेक वर्षांनी नाविकांचे न्यूसीशी असलेल्या समर्पण, आणि विश्वासामुळे हे सर्व शक्य झाले आहे. न्यूसीला यापूर्वी ५ वर्षांसाठी बहुमत देण्यात आले होते. धैर्याने आणि दृढनिश्चयाने २००८ ते २०१८ या कालावधीसाठी प्रलंबित असलेला सुधारित वेतन करार लागू केला होता. पोर्ट ब्लेअरची न्युसी शाखा ही मुख्य कार्यालयाच्या समन्वयाने सर्व प्रकारची मदत करीत आहे. न्यूसी ही महत्त्वाच्या क्षेत्रातील जहाजांवर सेवा करणाऱ्या नाविकांच्या हक्कांसाठी लढत आहे. न्यूसी आता अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थानिक खलाशी व कुटुंबांच्या भल्यासाठी लकरच पुन्हा भरघोस वेतन वाढीचा करार करेल. सर्व भारतीय आणि परदेशी ध्वजवाहू जहाजांवर न्यूसी मजबूत वेतन करार करून सर्व सदस्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी कायमच कठोर परिश्रम करीत राहील, असे मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.