संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

अंदमान निकोबारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पोर्ट ब्लेअर- पोर्ट ब्लेअरच्या 106 किमी पूर्व-ईशान्येस अंदमान आणि निकोबार बेटांवर आज सकाळी 7 वाजता 4.4 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 70 किमी होती. अंदमान निकोबारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले.

याआधी काल म्हणजेच शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अंदमान निकोबार बेटाच्या उत्तर-पूर्वेला १०८ किमी अंतरावर असलेल्या दिगलीपूरमध्ये ४.९ तीव्रतेचा भूकंप झाला.भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 किंवा त्याहून अधिक असल्यास, 40 किमीच्या त्रिज्येत जोरदार हादरा जाणवतो. त्याचवेळी गेल्या काही दिवसांत जम्मूच्या डोडा, किश्तवाड, कटरा (रियासी) आणि उधमपूर जिल्ह्यात कमी तीव्रतेचे एकूण 13 भूकंप झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. त्यांची तीव्रता अनुक्रमे 2.9 आणि 3.4 नोंदवली गेली. मात्र, या भूकंपांमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अंदमान आणि निकोबार बेटे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जिथे दरवर्षी लाखो लोक समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी पोहोचतात. येथे तुम्ही समुद्रपर्यटन, हत्तींसोबत पोहणे, सी प्लेनमध्ये बसणे, आयलंड हॉपिंग, पक्षी निरीक्षण यांसारखे विविध उपक्रम करू शकता. याशिवाय ट्रेकिंगसारखे साहसी उपक्रम करणे हाही एक संस्मरणीय अनुभव आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami