एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
नवी दिल्ली – देशात सध्या काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे की, दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबामध्ये केंद्रित होण्याची दाट शक्यता आहे,त्यामुळे तामिळनाडू आणि पुड्डूचेरीमध्ये अति मुसळधार पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.
भारतीय हवामान खात्याने तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार, येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या सहा तुकड्या राज्यातील विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत.हवामान विभागाने दिलेल्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या सहा तुकड्या अरक्कोनमच्या नागापट्टिनम,तंजावूर, तिरुवरूर,कुड्डालोर, मायिलादुथुराई आणि चेन्नई येथे तैनात करण्यात आल्या आहेत.पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी या पथकांना अगोदरच तयार राहण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तर एनडीआरएफ नियंत्रण म्हणून अरक्कोनममधील परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबामध्ये केंद्रित होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये ७ ते ९ डिसेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते,६ डिसेंबर रोजी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.७ डिसेंबर रोजी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.८ डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह वादळासह येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.