संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अंटार्टिका झपाट्याने वितळतोय; वाढत्या तापमानाचा फटका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – जगातील सर्वात थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंटार्टिका भागालाही पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा फटका बसत असून या भागातील महाप्रलय म्हणजेच डूमस डे या नावाने ओळखले जाणारे हिमक्षेत्र आता झपाट्याने वितळू लागले आहे.

गेल्या ५ हजार ५०० वर्षांत प्रथमच यावर्षी हिमनग वितळण्याचे प्रमाण सर्वांत जास्त असल्याचे संशोधनानंतर समोर आले आहे. डूमस डे हिमक्षेत्र जवळजवळ ब्रिटनच्या आकाराचे आहे. अंटार्टिका प्रदेश 2 भागांत विभागाला आहे. पूर्व आणि पश्‍चिम असे दोन विभाग आहेत. पश्‍चिम विभागातील हिमक्षेत्र गेल्या काही वर्षांत झपाट्याने वितळत आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनाप्रमाणे ही गोष्ट लक्षात आली आहे की, पूर्व भागातील हिमक्षेत्रसुद्धा आता पूर्वीपेक्षा जास्त वेगाने वितळू लागले आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढणार, असे दिसते आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami