संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनात वाढ व्हावी, अशा अनेक प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कृती समितीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
गेली साडेपाच वर्षे राज्य सरकारने तर गेली साडेचार वर्षे केंद्र शासनाने मानधनात कोणतीही वाढ केली नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘याआधी अनेकदा संपाची रीतसर नोटीस दिल्यानंतर शासनाने बैठक बोलावली नाही. चर्चा करणे अपेक्षित होते. तीही करण्यात आली नाही. आमचा संताप आता अनावर झाला असून आम्ही संप जाहीर करत आहोत,’ असे अंगणवाडी कृती समितीचे एम.ए. पाटील यांनी सांगितले. पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे, तसेच आहार व इंधनाचे दर, अंगणवाडीचे भाडे वाढवणे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या