संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

अंकिताच्या हत्येने उत्तराखंड हादरले! भाजप नेत्याच्या कृत्याने लोक संतापले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून- अंकिता हत्या प्रकरणानाने उत्तराखंड हादरले आहे. रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारीने पाहुण्यासोबत झोपण्यास नकार दिला. त्यामुळे कालव्यात ढकलून तिची हत्या केली. रिसॉर्टच्या मालकासह दोन कर्मचारी या हत्येत समिल आहेत. आरोपींमध्ये रिसॉर्ट मालकाच्या मुलाचा समावेश आहे. हरिद्वारचे भाजप नेते विनोद आर्य यांचे हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून याच्याविरोधात उग्र निदर्शने केली.

चिला कालव्यात आज सकाळी अंकिताचा मृतदेह सापडला. नातेवाइकांनी तिचा मृतदेह ओळखला. १८ सप्टेंबरपासून ती बेपत्ता होती. तत्पूर्वी रात्री उशिरा हे रिसॉर्ट बुलडोझरने पाडण्यात आले. या घटनेबद्दल शोक व्यक्त करून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांचे वाहन अडवून आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यातही धडक दिली. श्रीकोट येथील अंकिता भंडारी (१९) गंगाभोगपूर येथील वनंतरा रिसॉर्टमध्ये काम करत होती. ती १८ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. १९ सप्टेंबरला रिसॉर्ट ऑपरेटर पुलकित आर्य यांनी ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. डीएम पौरी यांनी हे प्रकरण लक्ष्मणझुला पोलिसांकडे वर्ग केले. त्यात आरोपी अंकितावर रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या लोकांशी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचा आणि तिने नकार दिल्यामुळे तिची तलावात ढकलून हत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार हॉटेल मालक पुलकित आर्य, सहाय्यक व्यवस्थापक अंकित गुप्ता आणि व्यवस्थापक सौरभ भास्कर यांना पोलिसांनी अटक केली आहे. नंतर हे रिसॉर्ट पाडले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यांना आंदोलन करून कडक कारवाईची मागणी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami